महत्वाची सूचना
महत्वाची सूचना
सर्व
आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, मा.उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल
अभिकरण, मुंबई व मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक यांनी सूचित केल्याप्रमाणे आपल्याकडे ज्या डीसीपीएस कर्मचा-यांचे Missing Credit असतील
त्यांचे प्रस्ताव तात्काळ कोषागार कार्यालयात डीसीपीएस शाखेत सादर करावेत. रा.अ.दे.अ.कार्यालय,
मुंबई यांनी दि.17.1.2023 रोजीच्या Email संदेशान्वये Missing Credit रकमांच्या
Entries करण्याचा सेवार्थ प्रणालीतील Tab दि.31.1.2023 रोजी संध्याकाळी बंद केला जाणार
आहे असे कळविले आहे.
तरी याची तातडीने दखल घेवून Missing Credit चे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याची
दक्षता घेण्यात यावी. त्यानंतर सादर होणारे
प्रस्ताव Tab बंद होण्याच्या कारणास्तव स्वीकारले
जाणार नाही याची नोंद घ्यावी.
आदेशावरून
(डॉ.राजेंद्र गाडेकर)
वरीष्ठ कोषागार अधिकारी, नाशिक