महत्वाची सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित
करण्यात येते की, मा. उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व मा.सहसंचालक,
लेखा व कोषागारे, नाशिक यांनी दि.17.1.2023 रोजीच्या ईमेल संदेशात कळविले आहे की अजूनही
ब-याच कर्मचा-याचे स्तर 2 मधील जमा रकमांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत व त्या रकमा संबंधित
कर्मचा-यांना प्रदान करण्यास विलंब होत आहे. तरी आपल्या कार्यालयातील ज्या कर्मचारी
/ अधिकारी यांचे डीसीपीएस योजनेतील Tier II मधील व्याजासह रकमा प्रदान करण्याचे प्रस्ताव
अदयाप सादर करण्यात आलेले नाहीत व प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सादर करण्यात यावे.
सदरचे प्रस्ताव सादर करताना दि.8.10.2021 च्या शासन निर्णयात दिलेल्या अटींनुसार आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडून परिपूर्ण
प्रस्ताव या कार्यालयास पाठविण्यात यावेत.
आदेशावरून
(डॉ.राजेंद्र गाडेकर)
वरीष्ठ
कोषागार अधिकारी, नाशिक