परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर- 2 मध्ये जमा थकबाकीच्या रकमेचे व्याजासह कोषागारातून आहरण करणेबाबत.
प्रति,
सर्व आहरण व संवितरण अधिकारी
महोदय,
उपरोक्त विषयांन्वये आपणांस कळविण्यांत
येते की, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना
दि.01 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 पर्यंतच्या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाच्या
थकबाकीची रक्कम त्यांच्या नवीन परिभाषित अंशदान
निवृत्तीवेतन खात्यातील स्तर-II मध्ये जमा करण्याचे निर्देश वित्त विभाग शासन निर्णय
दि.29.04.2009 अन्वये देण्यात आले होते. त्यानुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-II मध्ये जमा असलेल्या
थकबाकीचे व्याजासह प्रदान करण्याविषयी संदर्भ
क्रमांक 01 व 02 अन्वये निर्देशित करण्यात आलेले आहे.
तसेच संदर्भीय
पत्र क्रमांक 03 नुसार आपल्या कार्यालयातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू
असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे स्तर-II
मध्ये जमा असलेल्या थकबाकीचे व्याजासह प्रदाने करण्याबाबतचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे
कळविले आहे. तरी या पत्रासोबत जोडण्यात आलेल्या यादीनुसार आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने प्रलंबित प्रस्ताव त्वरीत सादर करावेत.
(किशोर एस पवार)
अप्पर कोषागार अधिकारी,
डीसीपीएस शाखा, नाशिक